नगर – कोठला ते सर्जेपुरा रस्त्यावरील टपरी व गाळेधारकांना महापालिकेकडून अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, ही जागा कॅन्टोमेंट (लष्करी हद्द) असून महापालिकेला हे अतिक्रमण काढण्याचा अधिकार नसल्याचे, अहमदनगर जिल्हा टपरीधारक व गाळेधारक संघटना ट्रस्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत टपरी व गाळेधारकांच्या न्याय, हक्कासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव एन.आय. पवार यांनी दिली. कॅन्टोन्मेंटच्या मालकीची 52 एकर जागा महापालिकेच्या हद्दी लगत आहे. रामवाडी, गोकुळवाडी, कौलारू, जे. जे. गल्ली, एसटी कॉलनी, कोठला, कोंड्यामामा चौक, राज चेबर, झेंडीगेट, नगर कॉलेज, कराचीवाला नगर, तारकपूर, शांतीपूर, तारकपुर बस स्थानक, मुख्यालय, कृष्णा अपार्टमेंट हे सर्व ठिकाण आजही कॅन्टोन्मेंटच्या मालकीची आहे.
जिल्हा न्यायालयाने वीस वर्षापूर्वी महापालिके विरुद्ध स्टे दिलेला आहे. आजही ते स्टे कायम आहे. मनपाने फलटण पोलीस चौकी, कोठला येथील दुकानदारांना नोटीस दिलेली आहे. कोठला ते सर्जेपुरा रस्त्यावरील दुकानदारांनी 30 दिवसाच्या आत अतिक्रमण काढून घ्यावे. मात्र, ही जागा कॅन्टोन्मेंटच्या मालकीची आहे. याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.