पुणे – भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. जर आपण रेल्वे स्थानकांबद्दल बोललो तर आपल्या देशात सुमारे 8,500 रेल्वे स्थानके आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रेल्वे स्थानकाबद्दल सांगणार आहोत, जे देशातील सर्वात हॉन्टेड रेल्वे स्टेशन म्हणजेच झपाटलेले रेल्वे स्थानक मानले जाते. संध्याकाळनंतर या रेल्वे स्थानकावर लोक दिसत नाहीत.
एवढेच नाही तर रात्रीच्या वेळी येथून एखादी गाडी गेल्यास प्रवासी खिडक्याही बंद करतात. हे स्थानक नुसते पाहिले तरी धोका होऊ शकतो असा लोकांचा समज आहे. यामुळेच हे स्थानक देशातील सर्वात झपाटलेले रेल्वे स्थानक मानले जाते.
सायंकाळी साडेपाच नंतर येथे एकही माणूस दिसत नाही. इथे गेल्यावर लोकांची भीतीने गाळण उडते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे स्टेशन कुठे आहे? तर आम्ही तुम्हाला याबद्दल सांगतो. चला, जाणून घेऊया.
हे भुताटकी रेल्वे स्टेशन बंगालच्या पुरुलियामध्ये आहे, ज्याचे नाव बेगुनकोदर आहे. जवळपास 42 वर्षे हे स्टेशन बंद होते, त्यामागील कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरं तर, स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की या स्थानकावर एका मुलीचे भूत आहे,
म्हणून लोक संध्याकाळी येथे जाण्यास टाळतात. बेगुनकोदर रेल्वे स्थानक 1960 मध्ये सुरू करण्यात आले होते, परंतु 7 वर्षानंतर ते बंद करण्यात आले. 2007 मध्ये हे स्थानक पुन्हा सुरू करण्यात आले असले तरी आजही हे स्थान भुतांचा अड्डा असल्याचे लोक मानतात.
हे स्थानक अतिशय निर्जन ठिकाणी आहे, आजूबाजूच्या इमारतीही खूप भीतीदायक दिसतात. या स्थानकावर प्लॅटफॉर्मही नाही. कोलकात्यापासून 260 किलोमीटर अंतरावर असलेल्या या झपाटलेल्या स्टेशनवर फक्त 12 बाय 10 फुटांचे तिकीट काउंटर आहे.
संथाल जमातीची राणी लखन कुमारी हिने हे स्थानक सुरू केल्याचे सांगितले जाते. लखन कुमारी यांनी स्टेशनच्या बांधकामासाठी रेल्वेला भरघोस सबसिडी दिली होती. स्टेशन सुरू झाल्यानंतर काही वर्षे येथे सर्व काही ठीक होते, परंतु नंतर येथे काही विचित्र घटना घडू लागल्या.
खरं तर, या स्थानकावर एका मुलीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर 1967 मध्ये बेगुनकोदर येथील एका रेल्वे कर्मचाऱ्याने येथे एका स्त्रीचे भूत पाहिल्याचा दावा केला होता. लोकांनी सांगितले की, या रेल्वे स्टेशनच्या रुळांवर एक मुलगी दिसली, तिने पांढरे कपडे घातले होते.
हळुहळू स्टेशनबद्दलच्या अनेक कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यामुळेच हे स्थानक झपाटलेले स्थानक म्हणून ओळखले जाऊ लागले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा स्टेशन उघडले तेव्हा स्टेशन मास्टरला रुळावर एक महिला दिसली. आजही या ठिकाणाशी संबंधित भूतकथा खूप प्रसिद्ध आहेत.