नांदेड – राज्य सरकारने कॅबिनेटच्या बैठकीत या रुग्णांच्या वाढत्या मृत्यूच्या घटनेकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता होती. मात्र तसे काही झाले नाही. आमदार सांभाळून ठेवण्यासाठी कोटी रुपयांची उधळण करणाऱ्या लुटारू सरकार रुग्णालयाला औषध (medicine) खरेदीसाठी दहा कोटी रुपये देऊ शकत नाहीत का? असा सवाल उपस्थित करत सरकारच्या नाकर्तेपणामुळे नांदेडमधील रुग्णालयात हत्या झाल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी केला आहे.
वडेट्टीवार यांनी नांदेड शासकीय रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर घेतलेलेत्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले की, माणुसकी असलेला कोणताही व्यक्ती संवेनशीलतेने हे पाहू शकत नाही, स्वतःचे अश्रू थांबवू शकणार नाही अशी स्थिती नांदेड शासकीय रुग्णालयात आहे. (Congress)
हृदय पिळून टाकणाऱ्या घटना शासकीय रुग्णालयात (nanded hospital)घडत आहे. पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाल्यामुळे एक कुटुंबीय धाय मोकलून रडत होते. यात नवजात बालकांचा काय दोष आहे? असा सवाल करत जे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यांना सरकारने आतातरी माणुसकी दाखवत प्रत्येकी 10 लाखांची आर्थिक मदत तातडीने करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.