नवी दिल्ली – आपण स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला येतो. जन्माच्या वेळी प्रत्येकाला एक जेंडर मिळतोच. पण कालांतराने शरीराची वाढ होतांना काहींना आपल्यात शारीरिक किंवा मानसिक बदल जाणवू शकतात. एखाद्या व्यक्तीला त्याचा जन्म विरुद्ध शरीरात झाला असे वाटू शकते मिळालेल्या त्या शरीरात जन्मल्यामुळं त्या व्यक्तीची घुसमट होऊ शकते. यावर उपाय म्हणून आता सेक्स रिअसाइन्मेंट सर्जरी म्हणजे लिंग बदलाची शस्त्रक्रिया हा उपाय करून हवं ते लिंग परिवर्तन करून शरीर मिळवलं जात. या शस्त्रक्रियेनंतर पुरुषाची स्त्री किंवा महिलेचा पुरुष होऊ शकते.
अशीच एक घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे,मध्यप्रदेशातील एका महिला कॉन्स्टेबलला मध्य प्रदेश सरकारच्या गृहमंत्रालयाने लिंग परिवर्तन करण्याची अनुमती दिलेली आहे. ही अतिशय अभिमनास्पद आणि ऐतिहासिक घटना आहे.गृह विभाग चे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश राजोरा यांनी याबाबत सांगितले की,’या महिला महिला कॉन्स्टेबलला लहानपणापासूनच जेंडर आयडेंटीटी डिसऑर्डरचा त्रास होता. तिच्यावर जेंडर आयडेंटीटी डिसऑर्डरसाठी उपचार करण्यात आले होते.
ती जेव्हा नोकरी करत होती त्या दरम्यानही तीच काम करण्याची पद्धत पुरुषाप्रमाणेच होती. जेव्हा तीला स्वत:च्या लिंगाविषयी अस्वस्थतेची भावना लक्षात आली. तेव्हा तिने तिने लिंग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तिने रीतसर परवानगी मागितली.
या महिला कॉन्स्टेबलला पोलिस मुख्यालयाने गृहविभागाकडून परवानगी मिळवली असून आता लिंग परिवर्तनाचा तिचा मार्ग मोकळा झालेला आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वतःच्या इच्छेनुसार व कायदेशीर पद्धतीने स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. मध्य प्रदेश सरकारने जो निर्णय दिला आहे तो ऐतिहासिक असून यापुढे अशा घटनांकडे कसं पाहायचं हा संदेश त्यांनी दिला आहे.
अशी होते लिंग बदलाची शस्त्रक्रिया?
रिअसाइन्मेंट सर्जरी म्हणजे लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्याअगोदर त्या व्यक्तीमध्ये जेंडर डिस्फोरिया म्हणजे स्वत:च्या लिंगाविषयी अस्वस्थतेची भावना असावी लागते.
यासाठी मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांची मदत घेतली. या व्यक्तीबरोबर दीर्घकाळ चर्चा करून मानसोपचारतज्ज्ञ जेंडर डिस्फोरियाविषयी निर्णय घेतात. असं असेल तर उपचारांची सुरुवात ‘हार्मोनल थेरपी’ने केली जाते. यामध्ये योग्य ते हार्मोन्सची औषधं आणि इंजेक्शन दिली जातात.