मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने कमी वेळात आपले स्थान निर्माण केले आहे. सारा अली खान सध्या तिच्या आगामी “अतरंगी रे’ चित्रपटामुळे चर्चेत असून प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. साराने आतापर्यंत अभिनेता अक्षय कुमार, रणवीर सिंह, कार्तिक आर्यन यांच्यासह अनेक अभिनेत्यांसोबत मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
बॉलीवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरू आहे. अशातच आता अभिनेत्री सारा अली खानने लग्नाबाबत मोठं गुपित उघड केले आहे. साराने एका मुलाखतीत सांगितले की, तिला असा नवरा हवा आहे जो तिच्यासोबत आईच्या घरी येऊन राहू शकतो. साराने म्हटले की, तिची आई अमृता सिंगने तिला सिंगल पॅरंट असूनही खूप चांगल्याप्रकारे सांभाळले.
त्यामुळे तिचा आईसोबतचा जिव्हाळा जास्त आहे. तिची आई तिला प्रत्येक गोष्टीत मदत करते. कसे कपडे घालावे, त्यासोबत कोणत्या बांगड्या, इअररिंग्स घालाव्यात या सर्व गोष्टींमध्ये आई अमृता तिला मदत करते. त्यामुळे सारा आईपासून दूर राहू शकत नाही. म्हणून साराला असा नवरा हवाय जो तिच्यासोबत आईच्या घरी येऊन राहील.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सारा सध्या तिच्या आगामी “अतरंगी रे’ या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहे. या चित्रपटात ती अभिनेता अक्षय कुमार आणि दक्षिणात्य अभिनेता धनुष सोबत रोमांस करताना पाहायला मिळणार आहे.