अनेक देशांतील स्वच्छता कर्मचाऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. कारण त्यांना खूप कमी पगार मिळतो. पण जगात असा एक देश आहे जिथे स्वच्छता कर्मचार्यांना डॉक्टर-इंजिनीअरपेक्षा जास्त पगार मिळतो. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे पूर्णपणे सत्य आहे. याचे कारण म्हणजे त्या देशात स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. गंमत म्हणजे लाखो रुपये पगार देऊनही तिथे सफाई कामगार मिळत नाहीत.
ऑस्ट्रेलियात स्वच्छता कर्मचार्यांना इतकी मागणी आहे की त्यांना डॉक्टर-इंजिनियरपेक्षा जास्त पगार मिळत आहे. कंपन्या सफाई कामगारांच्या पगारात तासाच्या हिशोबाने वाढ करत आहेत. त्यामुळे त्यांचा पगार एक कोटींपर्यंत पोहोचत आहे. सफाई कामगारांना महिन्याला सरासरी आठ लाख रुपये वेतन मिळत आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे असे असतानाही सफाई कर्मचारी महाग झाले आहेत. त्यांना वार्षिक एक कोटीपर्यंत पगार देण्यास कंपन्या तयार आहेत.
एका मीडिया रिपोर्टनुसार, सिडनीस्थित क्लिनिंग कंपनी ऍब्सोल्युट डोमेस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक जो वेस म्हणतात की, लोकांना साफसफाई करता येत नाही त्यामुळे त्यांचा पगार वाढवावा लागतो. कंपनीने सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारात 3600 रुपये/प्रतितास वाढ केली आहे.
2021 पासून ऑस्ट्रेलियात स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. एक वर्षापूर्वी कंपन्या त्यांना 2700 रुपये प्रति तास देत असत. आता कंपन्या सफाई कामगारांना 3500-3600 रुपये प्रतितास पगार देण्यास तयार आहेत. एवढा पगार देऊनही सफाई कामगार मिळत नाहीत.
अर्जुन खोतकर आणि एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट; राजकीय चर्चांना उधाण
ऑस्ट्रेलियातील अनेक कंपन्या क्लिनर न मिळाल्याने त्रस्त आहेत. काही कंपन्यांनी ताशी 4700 रुपयांपेक्षा जास्त पगार देऊ केला, मात्र त्यानंतरही सफाई कामगार मिळत नाहीत. या कंपन्या सफाई कामगारांना खिडक्या आणि गटर साफ करण्यासाठी वार्षिक 82 लाख रुपये देण्यास तयार आहेत.
ऐकावं ते नवलंच! ‘प्या,अन् श्रीमंत व्हा’ म्हणत धर्मगुरूंनी भाविकांना समोर बसवून पाजले मद्य
ब्रिटनमध्येही कर्मचाऱ्यांची कमतरता होती. तेथे केवळ कोबी तोडण्यासाठी वर्षाला तब्बल 65 लाख रुपये दिले जात होते. त्यामुळे अनेक देशांमध्ये रोजगाराची मोठी कमतरता आहे.