नवी दिल्ली : दारू पिणे शरीरासाठी हानिकारक असते हे आपण ऐकत आलो आहोत. पण याच दारूमुळे जर तुम्ही श्रीमंत होणार आहात असे जर कोणी तुम्हाला सांगितले तर…याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात एक धर्मगुरू आपल्या अनुयायांना श्रीमंत होण्यासाठी दारू पिण्याचे आवाहन करताना दिसत आहे.
एका धर्मगुरूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो आपल्या अनुयायांना दारू पिण्यास प्रोत्साहित करताना दिसत आहेत, एवढच नाही तर तो जितका जास्त दारू पिईल तितका तो श्रीमंत होईल, असे सांगताना दिसत आहे.सोशल मिडीआयवर व्हायरल झालेला व्हिडीओ हा थायलंडमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. या धर्मगुरूचे नाव फ्रा अजर्न काम्पी आहे. त्याचे मंदिर महा सराखम प्रांतातील चियांग युएन जिल्ह्यात आहे.
धर्म गुरूंना भेटण्यासाठी लोकांना वाट पाहावी लागते तसेच त्यांच्या भेटीचे असगोरच बुकिंगदेखील करावे लागते. दरम्यान, या धर्मगुरूंच्या एका एका महिला अनुयायाने हा व्हिडिओ शेअर केल्याने हे प्रकरण समोर आले. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती. व्हिडिओमध्ये तेथे उपस्थित असलेले लोक साध्या कपड्यात दिसत आहेत. ते लाल रंगाचे हेडबँडही घातलेले दिसतात. प्रत्येकजण जमिनीवर बसून खातो आणि पीतो. पुरोहिताचा पेहराव घातलेला एक माणूस लोकांमध्ये फिरतो आणि त्यांना प्रार्थना करण्यास सांगतो.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये महिलेने लिहिले- तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर या सोहळ्याचा भाग व्हा. हा सोहळा तुमचे नशीब आणि सौभाग्य दोन्ही बदलून टाकेल, तुम्ही समारंभात असताना मद्यपान थांबवण्याची गरज नाही. सोन्यासाठी बिअर प्या, श्रीमंत होण्यासाठी राइस व्हिस्की प्या. जितके तुम्ही प्याल तितकी तुमची संपत्ती वाढेल, असे त्या महिलेने म्हटले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लोक धर्मगुरूला फसवणूक म्हणत आहेत. तर या सर्व प्रकाणावर धर्मगुरूंनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे कि,” तो लोकांना फक्त दारू पिण्यास प्रोत्साहित करत नाही. आपल्या अनुयायांनाही मंदिरासाठी देणगी द्यावी लागते, असे ते म्हणाले. तो कोणावरही जबरदस्ती करत नाही. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते स्वतः त्याच्याकडे येतात.”