मासिक पाळीच्या विकारावर “हे” आयुर्वेदि‍क औषध ठरले रामबाण उपाय

दवणा हा अत्यंत सुगंधी असतो. शहरांच्या आसपास बागांमधून तो लावतात.सर्वांच्या परिचयाचा असतो. फुलांच्या वेण्यातून दवणा वापरण्याचा फार प्रघात जुना आहे. पण आयुर्वेदियदृष्ट्‌या देखील दवणा हे मोठे घरगुती औषध आहे.

शक्‍तीवर्धक – सुकलेला दवणा औषधात वापरतात. दवणा अत्यंत शक्‍तिवर्धक आहे.
अंगात कडकी असेल तर – अंगात कडकी असेल तर एक ग्रॅम दवणा पाण्यात भिजत टाकून सकाळी ते पाणी गाळून घेऊन त्यात खडीसाखर घालून घ्यावे.त्याचप्रमाणे सकाळी भिजत घालून संध्याकाळी घ्यावे, अंगातली कडकी जाते. व हुशारी वाटू लागते.

हाता पायांची आग किंवा जळजळ होत असेल तर – आदल्या दिवशी दिड ग्रॅम दवणा पाण्यात भिजत टाकून सकाळी ते पाणी गाळून घेऊन त्यात खडीसाखर घालून प्यावे.लगेचच हातापायांची जळजळ थांबते. ( indian wormwood ayurvedic medicine benefits )

डोळ्यांची आग होत असेल तर – एक ते दोन ग्रॅम दवणा पाण्यात भिजत टाकून सकाळी ते पाणी गाळून घेऊन त्यात पत्री खडीसाखर घालून प्यावे. उष्णता कमी होण्यासाठी व शांत झोप लागण्यासाठी – शरीरात कोणत्याही कारणाने आलेली गरमी (उष्णता) दवणा नाहीशी करते. रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी गाळून घेऊन त्यात दूध व खडीसाखर घालून ते प्यावे. त्याने उष्णता कमी होते. रात्री झोप छान येते व बरे वाटते.

कावीळमध्ये उपयुक्‍त – कावीळ ज्यात डोळे पिवळे व शौचाला पांढरे होते असा रोगदेखील दवण्याने बरा होतो. 22 ग्रॅम दवणा घेऊन त्यात 12ग्रॅम जिरे घालून किंचित्‌ कुटून कल्हईच्या भांड्यात अर्धा लिटर पाणी घालून एक अष्टमांश काढा आटवून उरवावा व तो साखर घालून दोन वेळा प्यावा. ह्या काढ्याने लघवीस होऊन कावीळ बरी होते.

जलोदरावर – पोटातील पाणी कमी करणारे दवणा हे एक औषध आहे. 22ग्रॅम दवणा व साडेतीन ग्रॅम कुरडूचे बी चांगले ठेचून कल्हईच्या भांड्यात 1/2 लिटर पाणी घालून एक अष्टमांश काढा उरवावा. त्याने लघवीस जास्त लागते व पोटातील पाणी आपोआप कमी होतो.

सांधेदुखीवर – सांधे दुखत असल्यास वाळलेल्या दवण्याचे चूर्ण करून कोमट पाण्याबरोबर घ्यावे.
शौचास साफ होण्यासाठी – परसाकडे साफ होण्यासाठी दवण्याचा काढादोन वेळा घ्यावा ज्याने शौचास व लघवीस साफ होते. ( indian wormwood ayurvedic medicine benefits )

अंगदुखीवर उपयुक्‍त – दवणा नियमित पोटात काढ्याच्या रूपात घ्यावा. त्यानं अंग दुखण्याचे थांबते.

मासिक पाळीच्या विकारावर – महिन्याच्या महिन्याला स्त्रियांना अंगावरून साफ जात नसेल तर दवण्याने ते जाऊ लागते दवण्याचे बारीक वस्त्रगाळ केलेले चूर्ण दर वेळेस 6 ग्रॅम असे दिवसातून चार वेळा मासिकपाळी चालू असताना कोमट पाण्याबरोबर घेतले असता अंगावरून साफ जाऊ लागते. विटाळ साफ येतो.व मासिक पाळीच्या इतर विकारांवरही दवणा उपयुक्‍त असतो.

गर्भाशयाच्या सर्व विकारांवर – दवण्याच्या चूर्णाबरोबर जर कापराचे चूर्ण एक ग्रॅम घेतले तर स्त्रियांच्या गर्भाशयासंबंधीचे सर्व विकार जातात. दवण्याचे बारीक चूर्ण करून ते अडिच ग्रॅम घेऊन ते भिजेल इतके निव्वळ शुद्ध तिळाचे तेल घालून रोज दोनवेळा सांजसकाळ घेतले असता गर्भाशयाचे सर्व विकार बरे होतात.

हिस्टेरिया रोगात उपयुक्‍त – गर्भाशयाच्या अशुद्धतेपासून अलीकडे हिस्टेरिया नावाचा एक रोग सुरू झाला आहे. ह्याची लक्षणे आयुर्वेदातील उन्माद, मूर्च्छा वगैरे रोगांसारखी आहेत. मुख्यतः वातरोगातील अप तंत्रक वायूशी ह्या हिस्टेरिया रोगाच्या लक्षणांशी साम्य आहे. ह्या हिस्टेरिया या रोगात तिळाच्या तेलात दवणा घ्यावा. हिस्टेरिया बरा होतो.

दातातून रक्‍त येत असल्यास – दवणा हे दातातून रक्‍त येत असता वापरतात. ताज्या दवण्याचा रस 12 मि.लि.खडीसाखर 12 ग्रॅम घालून पोटात घ्यावे. वरून दवण्याच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. म्हणजे दातातील रक्‍त थांबते. ( indian wormwood ayurvedic medicine benefits )

काही तरी रोग झाल्याचा भाव – दवणा फार मोठे औषध आहे. रोग्यास काही तरी रोग झाला अशी भावना सतत होते. मग अन्न पाणी गोड लागेनासे होते. अशावेळी दवणा हे औषध चांगले लागू पडते.एखाद्यास वर्षानुवर्ष वाटत असते की मला रोग झाला आहे, कपाळ दुखते, अंग मोडते, भूक लागत नाही, परसाकडे साफ होत नाही, झोप येत नाही अशा अनेक भावनायुक्‍त रोग्यास दवण्याचे चूर्ण दिले असता फायदा होतो.

कपाळदुखीवर – कपाळदूखीवर दवण्याचे वस्त्रगाळ केलेले चूर्ण चार ग्रॅम, पाव किलो गुलकंदातून रोज दोन वेळा रोग्यास द्यावे. त्याने रोग्याची कपाळदुखी थांबते. समाधान होऊन बरे वाटू लागते.
कानदुखीवर – ताज्या दवण्याचा रस दुखणाऱ्या कानात घातला असता दुखरा कान बरा होतो.
जखम भरून येण्यासाठी – कोणत्याही जखमेस दवण्याच्या पाण्याने धुतले असता व वर ताजा दवणा कुटून बांधला असता ती जखम भरून येते.

लघवीच्या विकारात – लघवी साफ होण्यासाठी 1ग्रॅम दवणा पाण्यात भिजत घालावा. सकाळी गाळून घेऊन या पाण्यात थोडे गाईचे दूध व पत्री खडीसाखर घालावी व ते प्यावे.लघवीचे सर्व विकार बरे होतात.

अशाप्रकारे दवणा ही सुगंधी वनौषधी अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे म्हणूनच देवालाही ती प्रिय आहे. आपल्या हिंदू देवांना दवणा वहाण्याची प्रथा फार पुरातन आहे( indian wormwood ayurvedic medicine benefits )

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.