नवी दिल्ली – दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता काहीही करू शकत नाहीत, दिल्ली पोलिसात आमचे गुप्हेतर हजर आहेत आणि आम्ही तुमच्याबद्दल सर्व माहिती घेत आहोत, अशा शब्दात भारतीय जता पक्षाचे खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना इसिस काश्मीरकडून तिसरी धमकी मिळाली आहे.
23 नोव्हेंबरच्या रात्री गौतम गंभीरला पहिला ईमेल आला, ज्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत गंभीरने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली होती. पण 24 तारखेला पुन्हा त्याला एक ईमेल आला, ज्यामध्ये काल तुला मारायचे होते, पण वाचलास, काश्मीरपासून दूर राहा’ असे लिहिले होते. या मेलसोबत गंभीरच्या घराबाहेरचा एक व्हिडिओही पाठवण्यात आला होता. ही धमकी त्याला इसिस काश्मीरने दिली आहे.
सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, गौतम गंभीरला धमकीचा मेल पाकिस्तानातून आल्याचे तपासत समोर आले आहे.