नवी दिल्ली – भारतीय संघाला पुढील वर्षीची टी-२० विश्वकरंडक स्पर्धा जिंकायची असेल तर संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच असणे महत्वाचे आहे. तसेच टी-२० संघात रोहिसह विराट कोहलीचेही स्थान महत्वाचे आहे. त्यांनी गेल्या काही काळपासून टी-२० संघातून माघार घेतली असली तरीही विश्वकरंडक स्पर्धेत त्यांना संघात स्थान देणे गरजेचे आहे, असे मत भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे. रोहित व कोहलीची कामगिरी पाहिली जावी वय नव्हे, असेही गंभीरने म्हटले आहे.
केवळ या दोघांचे वय जास्त आहे वगैरे चर्चांना अर्थ नाही. वयाच्या आधारावर नव्हे तर कामगिरीच्या आदारावर खेळाडूंची निवड झाली पाहीजे. विश्वकरंडक स्पर्धेला अद्याप मोठा कावालधी आहे, त्यापूर्वी भारतीय संघ टी-२० सामन्यांच्या काही मालिकाही खेळणार आहे. त्यात रोहित व कोहलीने खेळण्याचे निश्चित केले व त्यांची कामगिरी रस ठरली तर त्यांना विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघात घेतलेच पाहीजे, असेही गंभीर म्हणाला.
रोहितच्या कर्णधारपदात आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने तब्बल पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे रोहितच्या टी-२० संघाच्या नेतृत्वावर कोणीही काहीही बोलू शकत नाही. रोहितच्याच नेतृत्वाखालील भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. सलग १० सामने जिंकत वर्चस्वही राखले. केवळ अंतिम लढतीत पराभव झाला म्हणून रोहितच्या नेतृत्वावर शंका घेण्याचे कारण नाही. केवळ एक सामना गमावल्यावर तो वाइट कर्णधार ठरत नाही.
BCCI : पिंकबॉल टेस्टला भारताचा नकार; जय शाह यांनी सांगितले कारण…
रोहितला केवळ खेळाडू म्हणून खेळवू नका
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत अन्य कोणाला नेतृत्व देत रोहितला केवळ फलंदाज म्हणून संघात स्थान देऊ नये. तो जर संघात निवडला जाणार असेल तर तोच कर्णधारही असला पाहीजे, असे गंभीरने म्हटले आहे. जरी सध्या टी-२० संघाचा नियमित कर्णधार हार्दीक पंड्या आहे. तरीही टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत रोहितकडे नेतृत्व असावे असे माझे मत आहे, असेही गंभीरने सांगितले.