मायणी – मायणी येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर असलेल्या बालाजी ज्वेलर्स या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न झाला. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास दुकानात घुसलेल्या चार संशयितांनी दुकान मालक अमित माने यांना बंदुकीचा धाक दाखवून ऐवज मागणी करण्यास सुरूवात केली.
मात्र, माने यांनी मोठ्याने आराडा-ओरडा करण्यास सुरूवात केल्याने संशयितांनी पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे मायणी परिसरात मोठी खळबळ उडाली असून भितीचे वातावरण झाले आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अप्पर अधिक्षक अजित बोर्हाडे यांनी मायणीत भेट दिली. सांगली,सोलापूर जिल्ह्यांची सरहद्द असलेल्या मायणीसारख्या गजबजलेल्या शहरात ही घटना घडल्याने बन्सल यांनी तातडीने आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहे.