थेऊर – पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक मार्गावर कॉंक्रिटीकरण करण्यासाठी लोणीकंद ते थेऊरगाव रस्ता रविवार (दि. 7) ते मंगळवार (दि. 30) ऑगस्ट पर्यंत जड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. वरील कालावधीत दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक सुरु राहील, असे सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी कळविले आहे.
लोणीकंद / लोणीकाळभोर वाहतूक विभाग पुणे अंतर्गत वरील कालावधीत थेऊर फाटा, नगर रस्ता ते थेऊर फाटा, सोलापूर रस्ता दरम्यान जड वाहनांस बंदी करण्यास येत आहे. त्यामुळे खराडी बायपास ते हडपसर तसेच वाघोली – केसनंद – वाडेबोल्हाई, पारगाव – केडगाव – चौफुला – पुणे – सोलापुर महामार्ग या रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.