फेनोम पेन्ह (कंबोडिया) – चीनने सुरू केलेला क्षेपणास्त्रांचा सराव ताबडतोब थांबवण्यात यावा, अशी सूचना अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाकडून करण्यात आली आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यापासून चीनने तैवानच्या सामुद्रधुनीमध्ये क्षेपणास्त्रांच्या माऱ्याचा युद्धसराव सुरू केला आहे. त्यामुळे त्या भागात तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
तैवानच्या सामुद्रधनीच्या परिसरात चीनची अनेक लढूा जहाजे आणि लढाऊ विमाने आजदेखील बघितली गेली होती. तैवानच्या सागरी हद्दीमध्ये 13 लढाऊ जहाजे आणि लढाऊ विमाने घुसली होती आणि तैवानच्या मुख्य भूमीच्या दिशेने या युद्धनौकांवरून क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. या आक्रमक युद्धकोर सरावावर देखरेख केली जात असल्याचे तैवानने म्हटले आहे.
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे मोदींना खरमरीत पत्र; म्हणाले…
आसियानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 55 व्या बैठकीच्या निमित्ताने कंबोडियातीस फेनोम पेन्ह इथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांच्यासह ऑस्ट्रेलियाच्या पेनी बोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री हयाशी योसिमासा यांनी या आक्रमक युद्धसरावाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. हिंद – प्रशांत क्षेत्रातील मुक्त, स्वतंत्र आणि खुल्या वातावरणाला या तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाठिंबा दिला.
सकाळी स्वयंपाकपाणी, घरकाम तर दिवसभर हातात रुमणे…, महिलांच्या अंगी असलेल्या करारी बाण्याचे दर्शन