आपल्या ‘या’ सवयी रोगप्रतिकारक शक्ती करतात  कमजोर

कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत असणं गरजेचं आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण सर्वच जण प्रयत्न करत आहोत. मात्र आपल्या काही सवयी रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करू शकतात. त्या वेळीच बदलण्याची गरज आहे.

छोट्या छोट्या गोष्टींवरही तुम्हाला ताण घेण्याची सवय असेल, तर ते सोडून द्या.  जास्त ताण घेणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्दी-तापासारखी समस्या जास्त उद्भवते. कारण कोर्टिसॉल हार्मोन आपल्या पांढऱ्या रक्तपेशी नष्ट करतो आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.

सहा ते आठ तास तरी पुरेशी झोप मिळायला हवी. मात्र अनेक जण तितकी झोप घेत नाही, ज्याचा परिणाम रोगप्रतिकारक प्रणालीवर होतो.

तुम्ही शारीरिकरित्या सक्रिय नसाल, तर त्याचा तुमच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे शारीरिक कार्य, व्यायाम करा. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढेल.

जंक फूड, इन्स्टंट फूड खाणं टाळा. नाहीतर रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होईल.

अति मद्यपान आणि धूम्रपानामुळे यकृत, फुफ्फुसावर परिणाम तर होतोच शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होते आणि त्याबाबत आपल्याला समजतही नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.