प्रियांका चोप्रा – प्रियांका बऱ्याचदा अमेरिका आणि भारत दौऱ्यावर असते. अशा परिस्थितीत वेळ वाया जाऊ नये, म्हणून ती स्वतःचे जेट वापरते.
अमिताभ बच्चन – महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडेही खासगी जेट आहे. त्यांनी या जेटमधील स्वतःची तसेच कुटुंबीयांची अनेक छायाचित्रे सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहेत. बच्चन कुटुंब परदेशात सुट्टीसाठी जाताना ते स्वतःचे जेट वापरतात.
अक्षयकुमार – एका वर्षामध्ये चार ते पाच चित्रपट करणारा अक्षयकुमार इतका बिझी असतो की तो आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवू शकत नाही. त्यामुळेच जसा वेळ मिळेल तसा अक्षय आपल्या परिवारासह स्वतःचे जेट घेऊन परदेशात सुट्टीला जातो.
अजय देवगण – अजयकडे स्वतःचे जेट आहे. अजयकडे एअरक्राप्ट सिक्स सीटर हॉकर 800आहे.
शाहरुख खान – 2016 मध्ये शाहरुख खानने मुलाखतीत गमतीने म्हटले होते की, मला विमान खरेदी करायचे आहे; पण माझ्याकडे पैसे नाहीत. वास्तविक किंग खानकडे स्वतःचे जेट आहे.
शिल्पा शेट्टी – शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा हे राजेशाही जीवन जगतात. त्यांचे स्वतःचे खासगी जेट आहे.