किव्ह – “तिसरे महायुद्ध सुरू होण्याची शक्यता नाही.’ असे प्रतिपादन युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी केले आहे. बुधवारी गोल्डन ग्लोब पुरस्कार वितरणाच्या सोहळ्यामध्ये दूरदृश्य माध्यमातून सहभागी होताना त्यांनी हे मत मांडले. रशियाविरोधात युक्रेनच्या सुरू असलेल्या युद्धाचे रंग बदलत आहेत, असेही ते म्हणाले.
पहिल्या महायुद्धामध्ये सुमारे 10 लाख लोक मारले गेले. तर दुसऱ्या महायुद्धामध्ये 10 दशलक्ष लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आता तिसरे महायुद्ध होण्याची कोणतीही शक्यता नाही. युद्धाबाबत तिसरा अध्याय होण्याची शक्यता नाही, असे झेलेन्सकी म्हणाले.
मुक्त जगाच्या मदतीने युक्रेन आपल्या भूमीवरील रशियाच्या सैन्याला हाकलून देईल. सध्या 2023 साल सुरू आहे. अजूनही युक्रेन-रशियादरम्यानचे युद्ध समाप्त झाले नाही. मात्र या युद्धाचे रंग आता बदलायला लागले आहेत. हे युद्ध कोण जिंकणार, हे देखील आतापर्यंत स्पष्ट झाले आहे, असेही झेलेन्सकी म्हणाले.
Columbia : मोस्ट वॉन्टेड ‘अमरजीत सिंग राय’ अटकेत; भारत आणि कॅनडामध्ये…
गोल्डन ग्लोब पुरस्कारांची सुरुवात पहिल्यांदा झाली तेंव्हा म्हणजे 1943 साली दुसरे महायुद्ध समाप्त होण्याच्या परिस्थितीमध्ये होते. तेंव्हाही ते युद्ध कोण जिंकणार हे स्पष्ट होते. पण औपचारिकपणे काही गोष्टी घडण्याच्या बाकी राहिल्या होत्या, याची आठवणदेखील झेलेन्सकी यांनी करून दिली.