कोलंबिया – कॅनडातील पोलिसांनी भारत आणि कॅनडामध्ये मोस्ट वॉन्टेड असलेल्या अमरजीत सिंग राय या फरार गुन्हेगाराला अटक केली आहे. अमरजीत सिंग राय हा कॅनडात मोस्ट वॉन्टेड असलेल्या 25 गुन्हेगारांपैकी एक आहे. त्याला अटक करण्यात आल्याचे कॅनडातील रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी म्हटले आहे.
ब्रिटीश कोलंबियाचा बाग असलेल्या मेट्रो व्हॅनकुवर येथील निवासस्थानातून त्याला अटक करण्यात आली. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या 17 आरोपांखाली तो पोलिसांना हवा होता. त्याच्याविरोधातील तपास ऑगस्च 2019 पासून सुरू झाला होता, असे पोलिसांनी म्हटले आहे. अमरजीत सिंग राय घरातच असल्याचे ल7ात आल्यावर त्याला कोणत्याही चावाची संधी न देता थेट कारवाई करून ताब्यात घेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
अटकेनंतर त्याला सुरे आरसीएमपी येथे आणण्यात आले. तेथील कोठडीमध्येच त्याला ठेवण्यात आले असून न्यायालयाची पुढील सुनावणी होईपर्यंत त्याला या कोठडीतच ठेवण्यात येणार आहे.
Nepal : नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही आणण्याची वाढली मागणी; हजारो नागरिकांनी….
राय याला यापूर्वी सुरे आरसीएमपी स्ट्राईक फोर्स टार्गेट टीमने एप्रिल 2021 मध्ये अटक केले होते. त्याच्याविरोधात 2019 मध्ये बजावण्यात आलेले वॉरंट तोपर्यंत प्रलंबित होते. मे 2021 मध्ये त्याची न्यायालयाकडून सशर्त सुटका करण्यात आली होती. मात्र त्यानंतर तो न्यायालयातील सुनावणीला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात पुन्हा वॉरंट बजावण्यात आले होते.