मुंबई – ‘फर्जंद’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत. युवा पिढीला आपल्या अलौकिक इतिहासाचा उलगडा व्हावा म्हणून ‘फर्जंद’ नंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा ‘फत्तेशिकस्त’ चित्रपट लवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
दरम्यान, फत्तेशिकस्त चित्रपटातील अभिनेत्यांचे फर्स्ट लुक पप्रदर्शित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते आणि या गुप्तहेर खात्याचा कणा होते बहिर्जी नाईक. याच बहिर्जी नाईक यांची दमदार भूमिका अभिनेता ‘हरिश दुधाडे’ साकारणार आहे. तर समशेरबहाद्दर बाजी जेधेंची भूमिका दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर साकारणार आहे.
सवराज्याच्या वाघाला नीट बघून घे… या वाघाचं नाव…
सुभेदार तानाजी मालुसरे @OfficialAjayP #फत्तेशिकस्त १५ नोव्हेंबरला #Fatteshikast #15Nov @AAFilmsIndia #AlmondsCreations @DigpalOfficial @cdmandlekar @mrinal_kulkarni pic.twitter.com/ALKQsY7etJ— Fatteshikast फत्तेशिकस्त (@fatteshikast) September 20, 2019
शिवाजी महाराजांचं पोलादी चिलखत सरदार कोयाजी नाईक बांदल यांच्या भूमिकेत अभिनेता अक्षय वाघमारे दिसणार आहे. तसेच, शिवकाळातील शूर आणि विश्वासू सरदारांपैकी एक असणाऱ्या ‘येसाजी कंक’ ही महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता अंकित मोहनने चांगलीच कंबर कसली. तसेच, सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेता अजय पुरकर साकारणार आहे.
हत्ती समुर आला तरीबी शिवाजीराजांसाटी बुक्कीत डोसकं फोडीन त्येचं…
सवराज्याच्या पोशिंद्याची अभेद्य तटबंदी – येसाजी कंक! @ankittmohan #फत्तेशिकस्त १५ नोव्हेंबरला #Fatteshikast #15Nov @AAFilmsIndia #AlmondsCreations @DigpalOfficial @cdmandlekar @mrinal_kulkarni @Mrunmayeeee pic.twitter.com/puyWXz5ovl— Fatteshikast फत्तेशिकस्त (@fatteshikast) September 23, 2019
फत्तेशिकस्त चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजय आरेकर आणि अनिरुद्ध आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.येत्या 15 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ह्यो हात न्हवं… दुस्मनाचं रगात पिनारा दुधारी पट्टा हाय… राजांकडं नुसती नजर जरी वाकडी क्येली तरी मुंडकं उतरवून ठिवंन…गनिमाला फाडणारी शिवरायांची दुधारी तलवार सरदार बाजी सर्जेराव जेधे! @DigpalOfficial
#फत्तेशिकस्त १५ नोव्हेंबरला#Fatteshikast #15Nov@AAFilmsIndia pic.twitter.com/tGui8h3nev— Fatteshikast फत्तेशिकस्त (@fatteshikast) September 27, 2019
रानातल्या सिंहाला आन झुंजातल्या बांदलांना आडवं येत नसत्यात… दोगंबी येका फटक्यात कोथळा काहाडतात…
शिवाजी महाराजांचं पोलादी चिलखत सरदार कोयाजी नाईक बांदल | #akshayswaghmare#फत्तेशिकस्त १५ नोव्हेंबरला#Fatteshikast #15Nov@AAFilmsIndia #AlmondsCreations @DigpalOfficial pic.twitter.com/57reUcACJw— Fatteshikast फत्तेशिकस्त (@fatteshikast) October 2, 2019
जो सवराज्यासाटी हसत हसत वार खायला राजी,
त्याच्या रक्ताच्या कणाकणात येकच नाव व्हातं … शिवाजी !
सवराज्याचा गुप्तहेर बहिर्जी नाईक @harishdudhade#फत्तेशिकस्त १५ नोव्हेंबरला#Fatteshikast #15Nov@AAFilmsIndia #AlmondsCreations@DigpalOfficial @cdmandlekar @mrinal_kulkarni pic.twitter.com/Bjrd1FxTL7— Fatteshikast फत्तेशिकस्त (@fatteshikast) September 18, 2019