पुणे -संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सहभागी वारकरी आणि भाविकांसाठी फिरत्या शौचालयाची सुविधा देण्यात येणार आहे. सोहळ्यातील वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता यावर्षी शौचालयांची संख्या वाढविण्यात आली आहे. दोन्ही पालखी मार्गावर एकूण 1 हजार 600 शौचालय असणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी दिली.
गतवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात 700 शौचालये उभारली होती तर यावर्षी 900 शौचालये उभारण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात 500 शौचालये उभारली होती तर यावर्षी 700 शौचालये उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी जागा राखीव ठेवण्यात आली असून त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही. याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. वारीच्या मार्गातील धोकादायक असलेल्या झाडांची छाटणी करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. या सुविधा कराव्यात पालखी तळवारील जमिनीचे सपाटीकरण आणि स्वच्छता पालखी तळावर स्वच्छतागृह, चराचे शौचालय आणि त्याची स्वच्छता राखणे पाण्याचे स्रोत शुद्धीकरण करणे वीजपुरवठा करणे पालखी तळ आणि परिसरातील गटार, नालेसफाई करून जंतुनाशक फवारणी करणे वाहन आणि इंधनाची व्यवस्था तात्पुरते शौचालयाचे मलःनिस्सारण, शोषखड्डे स्वच्छता विषयक सोयी, सुविधा आणि इतर कामे पालखी स्वागत आणि निरोप ठिकाणी कक्ष असणार आहे.