राज्यात काही ठिकाणी केंद्रे सुरु
पुणे – राज्यात पोलीस, होमगार्ड, महसूल, महापालिका कर्मचाऱ्यांसारखे फ्रंटलाइन वर्कर्स यांची “को-विन’ ऍपवर नोंदणी पूर्ण झाली आहे. राज्यात पाच लाख 87 हजार 556 वर्कर्स असून त्यांना लसीकरणास सुरुवात झाली आहे. को-विन ऍपनुसार शहर, जिल्ह्यात त्या-त्या ठिकाणी केंद्रे सुरू होतात का, हे पाहून लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्यात काही ठिकाणी ही केंद्रे सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, पुणे शहरात अद्याप केंद्र सुरू झाले नाहीत. पुणे विभागात 1 लाख 11 हजार 124 एवढ्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी फ्रंटलाइन वर्कर्सचे को-विन ऍपद्वारे नवे केंद्रे सुरु झाली आहे. परंतु, अनेक ठिकाणी ही केंद्र सुरु होऊ शकली नाही, त्यामुळे नेमकी कोठे ही सुरु झाली याची नोंद अद्याप उपलब्ध नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पुण्यात फ्रंटलाइन वर्कर्सचे केंद्रच सुरु झाले नसल्याने आज लसीकरण झाले नसल्याचे स्पष्ट केले.