नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर कोसळले. त्यामुळे भारतीय सराफात शुक्रवारी साने आणि चांदीच्या दरात मोठी घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सेन्याचा दर 669 रुपयांनी कमी होऊन 56,754 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,026 रुपयांनी कमी होऊन 66,953 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,866 डॉलर आणि चांदीचा दर 22.12 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. जागतिक वायदे बाजाराते सोने आणि चांदीचे दर कमी झाले. त्यामुळे स्पॉट मार्केटमध्ये सोन्याच्या दरात घट झाली असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले.