मुंबई : “सर्वज्ञांनी संजय राऊत शिवीगाळ करूनही उजळ माथ्यानं महाराष्ट्रभर फिरत आहेत. दुसरीकडे गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत, पण महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणांना यात महिलांचा विनयभंग दिसत नाही. हे दुर्दैव आहे, असे म्हणत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे चित्रा वाघ यांनी संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच गुन्हा दाखल न झाल्यास गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच दिला.
शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत.. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत.. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही…
मी @maharashtra_hmo ना आवाहन करतीये..तात्काळ गुन्हा दाखल करा..नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.. pic.twitter.com/5wp3sI0hCN
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 19, 2021
तसेच चित्रा वाघ म्हणाल्या, “गुलाबराव पाटील हा राज्याचा पाटील आहे. शिवसेनेच्या नेत्यांना नेमकं काय झालंय? संजय राऊतांनंतर आता गुलाबराव पाटील यांनी खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलंय. गुलाबराव पाटील आणि रांझ्याचा पाटील यांची वृत्ती एकच आहे. रांझ्याच्या पाटलाची पाटीलकी छत्रपती शिवाजी महाराजांनी काढून घेतली होती.”
“सर्वज्ञांनी संजय राऊत शिवीगाळ करूनही उजळ माथ्यानं महाराष्ट्रभर फिरत आहेत. दुसरीकडे गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत, पण महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणांना यात महिलांचा विनयभंग दिसत नाही. हे दुर्दैव आहे. माझं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आवाहन आहे की, या गुलाबराव पाटलांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा. नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असेही चित्रा वाघ म्हणाल्या. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यावर वाद झाल्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप केला.