तेलंगणातील समलिंगी पुरुषांनी दशकभराच्या नात्यानंतर आता लग्न केले आहे. लग्नबंधनात अडकलेल्या या जोडप्याने आपला आनंद व्यक्त केला. सोबतच लग्न करून समाजाला मोठा संदेश दिला की, आनंदी राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही.
तेलंगणातील हे पहिले गे जोडपे मानले जात आहे. या समलिंगी जोडप्याने लग्नाबद्दल बोलताना सांगितले की, अद्याप त्यांना लग्नाची नोंदणी करता आलेली नाही मात्र त्यांनी लग्नाचा एक कार्यक्रम केला ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि मित्र उपस्थित होते.
या समलिंगी जोडप्यातील एक व्यक्ती सुप्रिमो चक्रवती आहे, ज्याचे वय 31 आहे, तर दुसरा अभय डांग आहे, जो 34 वर्षांचा आहे. दोघांनी आधी एकमेकांना अंगठी घातली आणि त्यानंतर एका रिसॉर्टमध्ये लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला.
सुप्रिमोने आपल्या सोशल मीडियावर लग्नाच्या फंक्शनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. यासोबतच कुटुंबीयही त्यांच्या आनंदात सहभागी होताना दिसत आहेत.
यापूर्वी सुप्रिमोने त्याच्या बॅचलर पार्टीचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये दोघांनी ग्रूम टू बी असा टॅग लावला होता. दोघांचे हे फोटो लोकांना खूप आवडले आणि त्यांना खूप शुभेच्छाही दिल्या. या समलिंगी जोडप्याची मैत्रीण सोफिया डेव्हिडने हे लग्न केले आहे, जी स्वतः एलजीबीटीक्यू समुदायातील आहे.