दुर्दैवी : नाला ओलांडताना युवक गेला वाहून

भंडारा – नाला ओलांडताना युवक वाहून गेल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पवनारा गावात घडली आहे. भारत परतेती (वय 35) असे वाहुन गेलेल्या युवकाचे नाव आहे.

मागील दोन दिवसांपासून भंडारा जिल्हात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे अनेक नदी नाले तुडंब भरून वाहत आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे तुमसर तालुक्यातील पवनारा गावात जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास भारत परतेती हा युवक नाला ओलांडत होता. यावेळी त्याला पाण्याचा अंदाज़ न आल्याने तो नाल्यात वाहून गेला. आपत्ती व्यवस्थापण विभागाच्या मदतीने शोध कार्य सुरू होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.