वाघोली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कायदा आघाडी, स्वाभिमानी संघर्ष सेना, आम्ही पुणेकर ढोल लेझीम पथक, पुणे नवेदीत हितगुज वकील मंच, पुणे भाजपा यांच्या संयुक्त प्रयत्नाने चिपळुन येथील पूरग्रस्त भागातील जनतेला एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत मदत करण्यात आल्याची माहिती कायदा आघाडी भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. संजय सावंत पाटील यांनी दिली आहे.
चिपळून भागातील लोकांचे खुप मोठे दैनंदिन व आर्थिक नुकसान झाले. बाजारपेठा सुध्दा उध्वस्त झाल्या. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन तसेच शंकरवाडी गावाच्या चौकात थांबून मदत करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. संजय सावंत पाटील, भाजपा कायदा आघाडी जिल्हा सहसचिव ॲड. शिवशंकर आघाव, स्वाभिमानी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ सांगळे, विजय बढे, भैया खंदारे, वैजनाथ गुट्टे, अमित शर्मा, विनायक पाटेकर, ढोल ताशा संचालक संकेत साळवी, बाळासाहेब खंदारे, पारस भोंडे, ऋषिकेश कांबळे,अथर्व कांबळे,पियुष खडके,सुकन्या अंचन, हर्षदा थावरे, उज्वला ताई कुंभार, स्वाभिमानी संघर्ष महिला आघाडी अध्यक्ष भाग्यश्री ताई पवार, आदी मान्यवर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.