पिंपरी – पिंपळे सौदागर येथील रहिवासी असलेला 18 वर्षीय कनक सचिन सहस्रबुद्धे, 26 डिसेंबर 2023 रोजी 151 व्या एनडीए कोर्स आर्मी विंगमध्ये सामील होणार आहे. कनकने अखिल भारतीय गुणवत्ता यादीत 367 वा क्रमांक पटकावला आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामात आत्मघाती बॉम्बरने जम्मूहून श्रीनगरला निमलष्करी जवानांना घेऊन जाणार्या ताफ्याला लक्ष्य केले. कनकवर या घटनेचा खोलवर परिणाम झाला. हल्ल्यात वडील गमावलेल्या एका लहान मुलाने भावनिक कविता गायली. त्या कवितेचा कनकवर मोठा परिणाम केला आणि हा मार्मिक क्षण कनकच्या भारतीय सैन्यासाठी स्वतःला समर्पित करण्याच्या निर्णयाचा उत्प्रेरक ठरला.
कनकला लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर आणि अॅपेक्स करिअर्समधील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. वाकडमधील विस्डम वर्ल्ड स्कूलमध्ये शालेय शिक्षणादरम्यान खउडए बोर्डांमध्ये 94 टक्के गुण मिळवणे आणि चिंचवडमधील विद्या व्हॅली ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर बारावीत प्रशंसनीय 73टक्के मिळविले. आपल्या ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी, कनकने छऊअ बॅचवर लक्ष केंद्रित करत लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर व अन्य तज्ज्ञ अधिकार्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
शैक्षणिक यशाशिवाय कनक हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याचे कुटुंब आणि मार्गदर्शकांना देत, वडील सचिन सहस्रबुद्धे, त्याची आई, विस्डम वर्ल्ड स्कूलच्या पूर्व-प्राथमिक शिक्षिका काश्मिरा सहस्रबुद्धेयांच्याकडून बहूमूल्य सहकार्य मिळाल्याचे तो आवर्जुन सांगतो.कनकचा प्रेरणादायी प्रवास केवळ त्याची वैयक्तिक बांधिलकीच दर्शवत नाही तर प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या देशाची सेवा करू पाहणार्या तरुण व्यक्तींच्या देशभक्तीचा दाखला आहे.