पोपराव गावडे : टाकळी हाजी येथे बीटस्तरीय स्पर्धा उत्साहात
टाकळी हाजी – विद्यार्थ्यांना लहान वयापासून खेळाची आवड निर्माण होते. त्यातून भविष्यात चांगले खेळाडू तयार होतात. यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा आयोजन करताना जिल्हा परिषदेने चांगला उपक्रम हाती घेतल्याचे प्रतिपादन माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले.
बीट स्तरीय स्पर्धा बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी येथे आयोजित केल्या होत्या. त्यावेळी उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी युवा नेते राजेंद्र गावडे, विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय बारहाते, चेअरमन शिवाजी घोडे, मुख्याध्यापक पी. सी बारहाते, सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. झालेल्या क्रिडाप्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेला संघ तालुका पातळीवर पात्र ठरला असल्याचे टाकळी हाजी केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव बाजारे यांनी सांगितले.
स्पर्धेचे नियोजन विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर यांच्या सहकार्याने टाकळी हाजी केंद्रप्रमुख महादेव बाजारे, मलठण केंद्रप्रमुख शिवाजीराव वाळके, कवठे येमाई केंद्रप्रमुख सखाराम फंड, जांबूत केंद्रप्रमुख गणेश काळे यांनी केले. या वेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना स्नेहभोजन युवा नेते राजेंद्र गावडे यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन निचित यांनी केले.
स्पर्धा प्रकार व विजयी विद्यार्थी
50 मीटर धावणे- आर्यन बोर्हाडे फाकटे, तृप्ती पवार डोंगरगन. मोठा गट 100 मीटर धावणे- आर्यन बोर्हाडे कवठे येमाई, कार्तिकी शितोळे उचाळेवस्ती. गोळा फेक- सोहम दिघे काठापूर, वैष्णवी बरडे पिंपरखेड. थाळी फेक- शैलेश हिलाळ मुंजाळवाडी, वैष्णवी बरडे पिंपरखेड. खोखो लहान व मोठा गट- मलठण, उचाळे वस्ती. कबड्डी लहान गट- मलठण, मुंजाळवाडी. मोठा गट- मुले-मुली कवठे येमाई. उंच उडी लहान गट- समीर घोलवड पिंपरखेड, पंकजा जोरी जोरीलवण.
मोठा गट- आर्यन बोर्हाडे कवठे येमाई, जान्हवी भुजबळ मलठण. लांब उडी लहान गट- असार आलम जांबूत, प्राची पानगे निमगाव दुडे. मोठा गट – ऋषिकेश हिलाळ मुंजाळवाडी, ज्ञानेश्वरी इचके गणेश नगर. लेझिम स्पर्धा- जांबूत. प्रश्नमंजुषा लहान गट- देवांश दाते, आर्या टाकळकर. पिंपरखेड मोठा गट- राजकिरण ढोमे, ऋतिका गावशेते पिंपरखेड. भजन स्पर्धा लहान व मोठा गट मलठण. वकृत्व स्पर्धा लहान गट- स्वराली दाभाडे दाभाडे मळा, मोठा गट वैशाली मुंजाळ. लोकनृत्य स्पर्धा- ज्ञानेश्वरनगर, निमगाव दुडे.