Priyanka Gandhi On Narendra Modi| काँगेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी यांची आज सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मित्रांना सर्व काही विकलं. मोदींनी मोठ्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये माफ केले. स्वत:साठी विमान घेतले. पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काहीच दिले नाही, असे म्हणत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी आदिवासी समाजाबाबत देखील भाष्य केले.
काय म्हणाल्या प्रियांका गांधी? Priyanka Gandhi On Narendra Modi|
प्रियांका गांधी म्हणाल्या की, “आदिवासींसाठी काँग्रेसने अनेक योजना सुरु केल्या. राहुल गांधी असे नेते आहेत ज्यांनी 4 हजार किलोमीटरची यात्रा केली आहे. काँग्रेसचा पाया गांधी विचारांचा आहे. लोकशाहीत जनता सर्वोतोपरी असते. पण भाजपची विपरीत विचारधारा आहे. आदिवासी संस्कृतीचा आदर भाजप करत नाहीत, ते संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या वेळी आदिवासींवर अन्याय होतो त्यावेळी भाजप गप्प राहते. आदिवासींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने एकमेव आदिवासी मुख्यमंत्री सोरेन यांनाहीजेलमध्ये पाठवले आहे.”
“काँग्रेसने निर्माण केले ते नरेंद्र मोदी यांनी मित्रांना सर्व काही विकले. मोदींनी मोठ्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये माफ केले. स्वत:साठी विमान घेतलं. पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. खरबपतींचे मोदी मसीहा आहेत. पण आता बदलाची वेळ आली आहे. 10 वर्ष झाली तरी विकास झाला नाही. महागाई वाढली आहे, भाजप सतत आदिवासींचा अपमान करत आहे. देशात 22 लाख आदिवासींना जमीन पट्टे दिले नाहीत. मोदी सांगता सबरीचा पुजारी आहे. पण देशात शेकडो शबरींचा अपमान केला जातं आहे, तेव्हा मोदी का? गप्प राहतात,” असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेसची गॅरंटी Priyanka Gandhi On Narendra Modi|
“काँग्रेसची गॅरंटी आहे. आम्ही सर्व आश्वासन पूर्ण करणार आहोत. गोरगरीबांना आम्ही 25 लाखापर्यंत उपचार मोफत करणार आहोत. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ महिलेच्या खात्यात एक लाख रुपये देणार आहोत. पदवीधरांना नोकरी देणार आहोत. आमची सत्ता आल्यावर आम्ही देशातील 30 लाख पदे भरणार आहोत. परीक्षा शुल्क माफ करणार आहोत. पिकांना किमान मूल्य देणार आहोत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आयोग बनवणार आहोत. शेती व्यवसायातील जीएसटीची जाचक अट काढणार आहोत,” असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
“गरिबांकडे अनेक समस्या आहेत. त्यांच्याकडे मोदी स्वतःच्या समस्या मांडतात. मोदी यांचा संपर्क जनतेशी तुटला आहे. त्यांचे नेतेच त्यांना घाबरतात. देशातील गरीब खचला आहे, त्याला उत्पन्न मिळत नाही. शेती करणे कठीण झाले आहे. पण मोदींना हे कळत नाहीत. त्यांना कोण सांगण्याची हिंमत करीत नाही.मोदींनी देशात सत्तेसाठी राजकारण केले जाणारी व्यवस्था निर्माण केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडले. पैसे देऊन लोकशाही विरोधात सत्तांतर केले. आम्ही मोदींप्रमाणे सत्ता बदल करणार नाही.”
इंदिरा गांधींच्या आठवणींना दिला उजाळा
प्रियंका गांधी यांनी यावेळी इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. इंदिरा गांधी सर्व समाजाला सोबत घेऊन जात असत. इंदिरा गांधींनी संविधानाला नेहमीच मजबूत ठेवले. नेहमी तुमच्या अधिकारासाठी लढल्या. जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा त्या तुमच्यामध्ये आल्या आणि तुमचे अधिकार आणि समस्या सोडवण्याचे काम केल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा:
‘मोदी जिंकले तर अमित शहांना पंतप्रधान बनवणार…’केजरीवालांनी केला मोठा दावा