वडगांव हवेली – कै. दिनकरराव शिदोजी जगताप प्रतिष्ठानचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असून गेली सव्वीस वर्षे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन अखंडितपणे करत आहात, हे फार कौतुकास्पद आहे. स्व. जगताप (आप्पा) यांच्या विधायक कार्याचा वारसा यापुढेही सुरू रहावा, असे प्रतिपादन ना. डॉ. अतुल भोसले यांनी केले.
वडगाव हवेली, ता. कराड येथील कै.दिनकरराव शिदोजी जगताप (आप्पा) यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कै. दिनकरराव शिदोजी जगताप प्रतीष्ठान, प्राथमिक आरोग्य केंद्र वडगांव हवेली, स्व. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील (काका) होते. जि. प. सदस्या प्रियांका ठावरे, अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, शिवाजी पवार, गोळेश्वरचे उपसरपंच प्रदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. संगीता देशमुख, डॉ. चोपडे, डॉ. घोलप, पद्मसिंह जाधव, महादेव पाटील, संदेश पाटील, भानुदास जगताप, धनंजय जगताप, बाळासाहेब जगताप, पोपटराव जगताप, विविध गावचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. प्रास्ताविक जगदीश जगताप तर आभार श्रीरंग साळुंखे यांनी मानले.