डॉ. अतुल भोसले यांना काम करण्याची संधी द्यावी

डॉ. सुरेश भोसले यांचे आवाहन

कराड  – पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे खंडपीठ होणे आवश्‍यक आहे. लोकसंख्येचा विचार करता कोल्हापूर हे ठिकाण योग्य आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी बार असोशिएशनची ही मागणी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले हा राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवतील. आपण सर्वांनी मिळून अतुलबाबांना काम करण्याची एक संधी द्यावी, ते या संधीचे सोने करतील, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित कराड बार असोशिएशनच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्ष नितीन पाटील, ऍड. दिपक थोरात, ऍड. ए. वाय. पाटील, ऍड. एम. पी. देसाई, ऍड. एस्र. टी. घाटे, ऍड. भीमराव शिंदे, ऍड. विशाल शेजवळ, ऍड. अनिल माळी, ऍड. दौलत इनामदार, स्वप्निल कारंडे, ऍड. विशाल कुलकर्णी, ऍड. महेश शिंदे, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, श्रीरंग देसाई उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.