कराड -संपूर्ण जगाचे डोळे लागून राहिलेल्या ऐतिहासिक श्री राम मंदिर उभारणी सोहळ्यास बुधवार, दि. 5 ऑगस्टपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या निवासस्थानी श्री रामाची विधिवत पूजा करून अभिषेक केला. तसेच रामरक्षेचे पठण करून, हा ऐतिहासिक दिन साजरा केला.
अनेक वर्षे प्रलंबित राहिलेला श्री राम मंदिर उभारणीचा प्रश्न मार्गी लागला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारतवासियांचे हे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. जगाला हेवा वाटेल असे हे भव्य तीर्थस्थळ भारतात उभे राहत असल्याचे मत डॉ. अतुल भोसले यांनी यावेळी व्यक्त केले. धार्मिक विधीचे पौराहित्य विनायक जोशी यांनी केले.