नगर – एसटी महामंडळाच्या नगर विभागाच्या वतीने तारकपूर आगारातून महिलांसाठी आज नगर – पुणे अशी एसटी बस सुरू करण्यात आली. या बसचा शुभारंभ महिला वाहक संध्या हाळगावकर यांच्या हस्ते झाला.
दरम्यान, ही बस महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी सहा वाजता पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकातुन सुटणार असल्याचे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी सांगितले.
यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी दादासाहेब महाजन, उपयंत्र अभियंता दिलीप जाधव, पोपट घाडगे, आगार व्यवस्थापक अविनाश कल्हापूरे, सहायक वाहतूक अधिक्षक विठ्ठल केंगारकर आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी बसमधून 43 महिला प्रवाशांनी प्रवास केला. यावेळी महिला प्रवाशांचा एसटी प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या पहिल्या बसचे चालक म्हणून सतीश बोडखे तर वाहक संध्या हळगावकर यांना मान मिळाला आहे.