पाच जणांविरोधात गुन्हा दाखल; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
नगर – शहरातील चौधरी यांच्या वाड्यात कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या आठ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका शहर उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके यांच्या पथकाने केली आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साजीत अकबर चौधरी, सलीम अकबर चौधरी (दोघे रा. नालाबंद खुंट, करशेदजी रोड नगर) यांना पोलीसांनी घट्नास्थळी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळालेल्या माहिती नुसार नालाबंद खुंट चौधरी यांच्या व्ाडयात 1 लाख 20 हजार किमतीच्या गोवंश जातीचे आठ जनावरे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, चव्हाण, निमसे, सलीम शेख यांच्यासह पथकाने बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून 8 जनावरांची सुटका केली.
संगमनेर शहरालगत असलेल्या मदिनानगर भागात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कत्तल खान्यावर नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी सुमारे 10 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई बुधवारी (दि.21) रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली.
संगमनेरातील मदिनानगर भागात मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरे कत्तलीसाठी आणले असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेस याची माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.21) रात्री दहाच्या सुमारास मदिनानगर भागातील बेकायदेशीर चालणाऱ्या कत्तल खाण्यावर छापा टाकून 45 हजार रुपये किमतीच्या 3 गायी, एक लाख 25 हजार रुपये किमतीचे पाच बैल, 20 हजार रुपये किमतीची चार वासरांची मुक्तता पोलिसांनी केली.
यावेळी घटनास्थळावरून आठ लाख 25 हजार रुपये किमतीचा आयशर टेम्पो पोलिसांनी जप्त केला. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पो. कॉ. रवींद्र घुंगाशे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी निसार अब्दुल शेख (रा. कुरण रस्ता, संगमनेर), नविक ऊर्फ नवाद जावेद कुरैशी (रा. भारतनगर, संगमनेर), मुद्दसीर ऊर्फ बुंदी अब्दुल करीम (रा. मदिनानगर, संगमनेर) या तिघांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, निसार शेख यास अटक करण्यात आली आहे.