परिणिती चोप्राचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. स्वतः परिणितीने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हॅरी पॉटरच्या स्टाईलमध्ये परिणिती हातात जादूची छडी घेऊन जादू करताना दिसते आहे. आपण हॅरी पॉटरची खूप जबरदस्त फॅन असल्याचे परिणितीने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
हॅरी पॉटरच्या कथेमध्ये ज्याला अजिबात जादू येत नाही, त्याला मगल म्हटले जाते. परिणितीने एक लांबलचक रोबही परिधान केला आहे. त्यामुळे तिने स्वतःला मगल म्हणूनच संबोधले आहे. ही छडी घेऊन ती कोणती जादू करायला निघाली आहे, हे मात्र तिने सांगितले नाही. काही दिवसांपूर्वी परिणितीने युनिव्हर्सल स्टुडिओचा दौरा केला होता, तिथूनच तिने हा रोब आणि जादूची छडी मिळवली आणि हा व्हिडीओ बनवला आहे.
परिणिती सध्या द गर्ल ऑन ट्रेनच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा याच वर्षी 8 मे रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय सायना नेहवालचा बायोपिक सायनामध्येही परिणिती दिसणार आहे. जबरीया जोडीमध्ये तिचा जबरदस्त परफॉर्मन्स गेल्याच वर्षी पब्लिकने बघितला आहे. त्यात ती सिद्धार्थ मल्होत्राबरोबर दिसली होती.