आंबवणे- आंबवणे (ता. मुळशी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली आहे. या कर्मचाऱ्याचा करोना चाचणीचा अहवाल शनिवारी (दि. 13) पॉझिटिव्ह आला. हा कर्मचारी मावळ तालुक्यात राहायला असून मागील 10 दिवसांपासून रजेवर असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेले नाहीत.
त्यामुळे आंबवणे येथील ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. तसेच योग्य ती काळजी घेऊन घराबाहेर पडताना मास्क वापरावा. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कारंजकर, सरपंच मच्छिंद्र कराळे, उपसरपंच गोरक्ष मेहता, पोलीस पाटील गणेश दळवी यांनी केले आहे.