पुणे – नागरिकांच्या सहभागातून पुणे महापालिकेमार्फत रविवारी शहरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध सार्वजनिक रस्ते, वस्ती परिसर, ऐतिहासिक स्थळे आणि पर्यटनस्थळे अशा विविध ठिकाणी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एअरपोर्ट रोड, विकफिल्ड सर्कल चौक (के. रहेजा बिल्डर्स), 509 चौक (शुभ डेव्हलपर्स), गोल्फ क्लब (पंचशील), गुंजन चौक, खराडी बायपास चौक, रामवाडी जकात नाका, आगाखान पॅलेस, लूप रोड आणि रिटस शेरेटॉन हॉटेल या भागात, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत गोल्फ क्लब (पंचशील), गुंजन चौक, पर्णकुटी चौक या परिसरात, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बंड गार्डन चौक, वाडिया कॉलेज चौक, रुबी हॉल चौक, जहांगीर हॉस्पिटल, आरटीओ चौक या भागात आणि शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चतु:शृंगी मंदिर, पाताळेश्वर मंदिर, झाशी राणी चौक, सेनापती बापट रोड, सीओईपी चौक, संचेती चौक, एस. जी. बर्वे चौक, मॉर्डन चौक, शिमला ऑफिस चौक, कृषी विद्यापीठ चौक, जेएम मॅरिएट हॉटेल, विठ्ठल तुकाराम भोसले चौक, खांडेकर चौक, भांडारकर रोड कॉर्नर, खंडूजी चौक, लकडी पूल या भागामध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. याव्यतिरीक्त इतर सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत देखील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेचे उद्घाटन ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त आशा राऊत, उपायुक्त नितीन उदास, अविनाश सपकाळ, आशिष महादळकर, ब्रॅंड अँबेसिडर, सत्या नटराजन, रुपाली मगर आणि निर्मला थोरमोठे, डॉक्टर केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, स्वच्छ पुणे स्वच्छ भारतचे विंग कंमांडर पुनीत शर्मा, पुणे प्लॉगर्स, एनएसएसचे स्वयंसेवक, चैतन्य हास्य क्लब, स्वच्छ संस्था, “अदर पूनावाला एनवायकेएस’ च्या आम्रपाली चव्हाण, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, एस. एन. डी. टी कॉलेज, हुजूरपागा कॉलेज, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमस, डेक्कन कॉलेज, पी. जोग कॉलेज, बीएमसीसी कॉलेज, एच. व्ही. देसाई कॉलेज, नेहरू युवा केंद्र संघटन, राष्ट्रीय सेवा योजना, वर्शिप अर्थ फाऊंडेशन, एकता योग फाऊंडेशन, भूमी जनविकास संस्था, एसपी महाविद्यालय इत्यादी शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी असे एकूण तीन-साडेतीन हजार जण मोहिमेत सहभागी झाले होते.
सात हजार पुणेकरांचे परिश्रम
15 क्षेत्रीय कार्यालये मिळून एकूण 77 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून 27 हजार 819 किलो सुका कचरा, तीन हजार 724 किलो ओला कचरा, चार हजार किलो राडारोडा असा एकूण 35 हजार 543 किलो इतका कचरा संकलित करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमध्ये एकूण सहा हजार 921 जणांनी आपला सहभाग नोंदवला.