Gautami Patil : कायमच संपूर्ण राज्यभर एका नावाची चर्चा चांगलीच होत असते. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही.
गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते.
View this post on Instagram
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला चालू असतो. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल आहे. गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण सध्या बनले असून, नेहमीच ‘सबसे कातिल, गौतमी पाटील’ हे नाव सर्वांच्या ओठावर असतं.
गौतमीने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर स्वतःचे नवीन फोटो शेअर केले आहेत. गौतमीने यात वेस्टर्न ड्रेस परिधान केला असून, तिचा ट्रेंडी लूक सगळीकडे व्हायरल होत आहे. गौतमीचे चाहते या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.