खडकवासला -सिंहगड घाट रस्त्यात उंबरदांड खिंडीजवळ चालती कारला लागलेल्या आगीत जळून खाक झाली. कारमधील पर्यटक वेळीच उतरल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि वनसंरक्षक कर्मचाऱ्यांनी सांगितले. पर्यटनासाठी सिंहगडावर पर्यटनासाठी सिंहगडावर रविवारी (दि. 8) सकाळपासूनच पर्यटकांनी गर्दी केली होती.
सकाळी सात वाजता सिंहगडावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीची चर्चा दिवसभर गडावर पर्यटकांमध्ये होती. यातच सायंकाळी पाचच्या दरम्यान एका पर्यटकाच्या चालत्या कारने गडावर जात असताना गडाच्या पार्किंगपासून खाली साधारण एक किलोमीटर अंतरावर पेट घेतला.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक व्यवस्थापनासाठी असलेल्या नितीन गोळे, संदीप कोळी, संभाजी खाटपे आदी वनसंरक्षण समितीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर कारमालकाने अग्निशमन दल आणि पोलिसांची संपर्क साधून घडलेल्या गोष्टीची घटनेची खबर दिली. अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत मोटार कार जळून खाक झाली होती.