मुंबई – चित्रपटरसिक ज्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत, तो अक्षय कुमार अभिनित ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 9 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर रिलीजपासूनच याची जोरदार चर्चा असून ‘कंचना 2’ या सुपरहिट तमिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे.
आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अक्षयचा या चित्रपटातील लूक खूप वेगळा आहे. दरम्यान, नुकतंच अक्षयने ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित केला असून, सिनेमाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर तुफान पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. हा एक भयानक आणि कॉमेडीने परिपूर्ण असा चित्रपट असणार आहे.
Jahan kahi bhi hain, wahi ruk jaayyein aur taiyyaar ho jaayyein dekhne #LaxmmiBomb ka trailer, kyunki barasne aa rahi hai Laxmmi! #LaxmmiBombTrailer out now. #YeDiwaliLaxmmiBombWali! 💥
#FoxStarStudios #DisneyPlusHotstarMultiplex @advani_kiara @offl_Lawrence pic.twitter.com/oJM6YljkBX
— Akshay Kumar (@akshaykumar) October 9, 2020
‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाची कथेचा अंदाज येतो. चित्रपटात अक्षय एका व्यक्तीच्या भूमिकेत आहे जो भूतांना घाबरतो पण नंतर असे काही घडते की, ट्रान्सजेंडरचा आत्मा त्याच्या शरीरात शिरतो. ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचा एक डायलॉग आहे, ”ज्या दिवशी भूत माझ्यासमोर येईल, त्या दिवशी मी बांगड्या घालेन.” त्यानुसार त्याचा बदलत गेलेला अंदाज पाहायला मिळतो.
‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट 22 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र लॉकडाउन असल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.