डोर्लेवाडी – माणुसकीला काळीमा फासणारी घटना बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री घडली. एका मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात सावत्र बापाने नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बारामती तालुक्यातील मोरगाव (शेरेवस्ती) या ठिकाणी राहत असलेल्या सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेबाबत कोठेही वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी देखील पीडित मुलीला आरोपीने केली आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तक्रार केली आहे.
तक्रार दिल्यानंतर आरोपीवर 473 / 2020 भादंवि 376 (ए बी सी ) 376 (2) एफ 506 बाललैंगिक अत्याचार कायदा 2005 चे कलम 4,5 एम, एन 6 अनुसूचित जाती जमाती कायदा कलम 3 (1) नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे अधिक तपास बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हे करीत आहेत.
– नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी