टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन ‘वॉर’मध्ये प्रथमच एकत्र आले होते. या दोघांचे ऍक्शन, स्टंट आणि जोरदार चेस सिक्वेन्स प्रेक्षकांना खूपच आवडले होते. “वॉर’ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. आता “वॉर 2’ची चर्चा सुरू झाली आहे.
पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही दणदणीत ऍक्शन असावी, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. “वॉर’चे डायरेक्टर सिद्धार्थ आनंद यांना हृतिक रोशन आणि प्रभासला एकत्र घेऊन एक सिनेमा करायचा होता. ही संधी त्यांना “वॉर 2′ मध्ये मिळण्याची शक्यता आहे.
“वॉर’मध्ये व्हिलन असलेल्या टायगर श्रॉफचा शेवटी मृत्यू झाल्याचे प्रेक्षकांना आठवत असेल. त्यामुळे आता “वॉर 2′ मध्ये व्हिलनच्या रोलमध्ये प्रभास दिसण्याची शक्यता आहे. सध्या सिद्धार्थ आनंद प्रभासला घेऊन एक बिग बजेट सिनेमा करत असल्याची चर्चा आहे.
प्रभास आणि सिद्धार्थ आनंद यांच्यात यासंदर्भाने खूप चर्चा झाली आहे. आता दोघांनी एकत्र ताजी स्क्रीप्ट वाचायचे ठरवले आहे. हा सिनेमा हृतिकबरोबरचा “वॉर 2′ असण्याची शक्यता अधिक आहे. याशिवाय “राधे शाम’, “आदिपुरुष’ आणि “सल्लार’मध्येही प्रभास असणार आहे.