8 सीए असलेले अनोखे गाव करंदी

बनलेले सीए शेतकरी कुटुंबातील ः शिरूर तालुक्‍यासाठी अभिमानास्पद गो÷ष्ट

शिक्रापूर- करंदी (ता. शिरूर) हे शेतकऱ्यांचे आणि पुणे जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अनोखे गाव आहे. या एकाच गावतील आठ शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षणातून भरारी घेत आता गावातून तब्बल आठ सीए झालेले असून करंदीतील या शेतकरी पुत्रांची भरारी तालुक्‍यासाठी अभिमानास्पद असून शेतकरीपुत्र म्हणून एका अनोख्या क्षेत्रात यशस्वी होण्याची परंपरा देखील मिळविली आहे. मागील वर्षी करंदीच्या सात युवकांनी सीए टीममध्ये भरारी घेतली होती तर आता यावर्षी अनिल ढोकले या युवकाची त्यामध्ये भर पडली असून करंदी हे आठ शेतकरी पुत्र सीए असलेले गाव बनले आहे.

सीएचे गाव म्हणून आठ शेतकरी पुत्रांनी गावची नवीन ओळख निर्माण केली आहे. करंदी गावाला सीएच्या परंपरेची सुरुवात सन 1996 मध्ये हनुमंत राधू मांदळे यांनी केली. त्यानंतर रवींद्र बगाटे यांनी सन 2006 मध्ये, अंबर टाकळकर यांनी सन 2006 मध्ये, देवेंद्र दरेकर यांनी सन 2016 मध्ये, प्रशांत ढोकले यांनी सन 2017 मध्ये, संकेत ढोकले व शरद दरेकर यांनी सन 2019 मध्ये सीए बनण्याचा मान मिळवित करंदीची परंपरा जपली आहे, तर या चालू वर्षी या परंपरेला अनिल दादाभाऊ ढोकले यांनी पुढे चालविले आहे.

आठ सीए पैकी प्रत्येक जण अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातला आणि सामान्य शेतकरी पुत्र म्हणून गावात परिचित आहे. गावातीलच जिल्हा परिषद शाळा व विद्या विकास मंदिरमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या अनिल ढोकले यांनीपदी शिक्षण पुण्यातील मॉर्डन महाविद्यालयात पूर्ण केले तर सीए इंटरशिपसाठी पुण्यातील एल.एम.जोशी ऍड कंपनीमध्ये 5 वर्षे अनुभव घेऊन यावर्षी दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी सीएची परीक्षा उत्तीर्ण होत करंदीचे आठवे सीए म्हणून नावलौकिक मिळविला आहे.

  • आमच्यामुळे गावची वेगळी ओळख झाल्याचा अभिमान – अनिल ढोकले
    करंदी (ता. शिरूर) गावामध्ये माझ्यापूर्वी आमच्या गावचे सातजण सीए झाले आणि मी आता आठवा सीए झाल्याने करंदी आता सीएचे गाव म्हणून तालुक्‍यात आणि जिल्ह्याच्या नकाशात चमकले. याचा सार्थ अभिमान वाटत असून माझ्या यशाचे सर्व श्रेय माझे आई वडील आणि करंदीतील सर्व ग्रामस्थ आणि माझ्यावर संस्कार करणाऱ्या शिक्षकांचे असल्याचे अनिल ढोकले यांनी सांगितले आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here