सातारा, (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या कार्यालयांच्या स्वच्छतेसाठी नोंदणीकृत बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना ठेका पद्धतीने काम देण्यात येणार आहे. त्यासाठी सेवा सोसायटी काम वाटप समितीतर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत.
यासाठी इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांनी कार्यरत असल्याची कागदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव दि. 1 एप्रिल पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे सादर करावेत.
मुदतीनंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा.