कौटुंबिक न्यायालयात जादूटोण्याचा प्रकार 

पुणे – कौटुंबिक न्यायालयातील पहिल्या मजल्यावर कुंकवाने भरलेले लिंबू फेकल्याचा प्रकार उघडकीस आला. न्यायपालिकेतच असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी विविध क्‍लुप्त्या लढवून पती-पती एकमेकांच्या अडचणीत वाढ करीत आहेत. त्यासाठी पक्षकार अघोरी प्रथांचा म्हणजेच उतारा टाकण्याचा प्रकार करीत असावेत. यापूर्वी जुन्या कौटुंबिक न्यायालयात देखील अशीच घटना घडल्याचे वकिलांनी सांगितले. न्यायालयीन सीसीटीव्ही तपासूनच हा प्रकार कोणी केला, याबाबत तपास करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, “न्यायालयात अर्धवट कापून कुंकू लावलेले लिंबू टाकण्याचा प्रकार विचित्र आहे. याबाबत चौकशी करून संबंधितावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावा,’ अशी मागणी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा ऍड. वैशाली चांदणे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.