अर्थिक मंदीबाबत सितारामन यांच्याक्‍डे काहीही उपाय नाही- कॉंग्रेसची टीका

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे अर्थिक मंदीबाबत कोणताही उपाय नसल्याची टीका आज कॉंग्रेसने केली. अर्थकारणाला गती देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज केलेल्या आजच्या उपाय योजना म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. अशी टीका कॉंग्रेसने केली आहे.

“मी एवढेच सांगू शकतो की अर्थमंत्री या संकटाच्या गंभीर्याला सामोरे कसे जायचे याबद्दल सुस्पष्ट नाहीत.’असे कॉंग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यापूर्वी अर्थकारणाला प्रोत्साहन देण्याच्या पॅकेजच्या घोषणेनंतर परिस्थिती बिघडली आणि ताजी पावले त्यासाठी मदतीसाठी उपयोगी ठरणार नाहीत, असे शर्मा यांनी ठासून सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.