पुणे – पायी जाणाऱ्या महिलेस दुचाकी आडवी घालून तीचे 60 हजाराचे गंठण हिसकावण्यात आले. हडपसर येथील ससाणेनगर येथे गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात दुचाकीवरील दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शितल शिंदे (37,रा.ससाणेनगर) या डी मार्टवरुन सामान खरेदी करुन चालल्या होत्या. यावेळी त्यांच्या समोर अचानक एक दुचाकी येऊन थांबली. त्यावर मागे बसलेल्या व्यक्तीने शिंदे यांच्या गळ्यातील 60 हजाराचे सोन्याचे गंठण हिसकावले.
शिंदे यांच्या हातात पिशव्या असल्याने त्या विरोध करु शकल्या नाही. त्या आरडा ओरडा करेपर्यंत आरोपींनी धुम ठोकली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत.