वाघोली : वाघोलीतील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना वाघोलीतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा ८७ झाला आहे. यापैकी २५ रुग्ण बरे झाले आहेत तर ६२ रुग्ण अॅक्टीव आहेत.
९ जुलै रोजी कोरोना रुग्णांचा आकडा ९ ने वाढला आहे. केसनंदमध्ये ७ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यापैकी २ रुग्ण बरे झाले आहेत तर ५ रुग्ण अॅक्टीव आहेत. आव्हाळवाडीत आणखी एक कोरोनाचा रुग्ण सापडला असून येथील सध्या २ रुग्ण अॅक्टीव आहेत.