मुंबई – दुबईमध्ये एक टी-20 लीग स्पर्धा होणार आहे. या लीगमध्ये आयपीएलमधील तीन संघ खेळणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई इंडियन्सची मालकी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा संघ खेळणार असल्याचे समोर आले आहे.
या लीगमध्ये सहा संघ असणार आहेत, पण या सहापैकी यावेळी पाच संघ ही भारतातील आयपीएल स्पर्धेशी संबंधित असल्याचे समोर येत आहे. तसेच कोलकाता नाइट रायडर्सचा मालक शाहरुख खानही या लीगमध्ये आपला संघ उतरवणार आहे.
आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची मालकी जीएमआर ग्रुपकडे आहे. हा ग्रुपदेखील या लीगमध्ये आपला संघ उतरवणार आहे. त्याचबरोबर या लीगमध्ये अदानी स्पोर्टस लाइन आणि कॅपेरी ग्लोबल कंपनी आपले संघ उतरणार आहेत. त्याचबरोबर या लीगमध्ये लान्सर कॅपिटल ही कंपनी संघ उतरवणार आहे. लान्सर ही कंपनी मॅंचेस्टर युनायटेडचे मालक ग्लेजर कुटुंबियांशी संबंधित आहे.
ही स्पर्धा 6 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणार आहे. या लीगमध्ये 38 दिवसांत 34 सामने खेळवण्यात येणार आहेत. या लीगमधील प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर 2 सामने खेळणार आहेत. त्यानंतर प्ले ऑफचे चार सामने खेळवण्यात येणार आहेत.