नवी दिल्ली: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातून भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हरियाणामधून दुष्यंतकुमार गौतम यांच्यासह दोन उमेदवारांना तर, मध्यप्रदेशातून दुसऱ्या जागेसाठी डॉ. सुमेरसिंग सोलंकी यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
Bharatiya Janata Party releases a list of candidates for the upcoming Rajya Sabha elections. pic.twitter.com/dLimYCwXBz
— ANI (@ANI) March 12, 2020
भाजपच्या प्रसिद्धीनुसार पत्रानुसार केंद्रीय निवडणूक समितीने रामचंद्र झांगडा आणि दुष्यंतकुमार गौतम यांना आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी हरियाणामधून उमेदवारी दिली आहे.
तर, भाजपने हिमाचल प्रदेशातून इंदू गोस्वामी यांना उमेदवारी दिली असून, डॉ. सुमेरसिंग सोलंकी यांना मध्यप्रदेशमधून उमेदवारी मिळाली आहे.
बुधवारी भाजपने ज्योतिरादित्य सिंधिया यांना मध्य प्रदेशातील उमेदवार म्हणून घोषित केले होते. तसेच महाराष्ट्रातून विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अमरीश भाई रसिकलाल पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे.