पुणे – आंबेगाव बुद्रुक येथील एक क्लिनिक फोडून चोरट्याने 70 हजाराची रोकड चोरुन नेली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी डॉ. वैभव दत्तात्रय लोटके (वय 41, रा.आंबेगाव बुद्रुक) यांचे क्लिनिक बंद असताना चोरट्याने दरवाज्याचे कुलूप तोडले. यानंतर क्लिनिकमधील 70 हजारांची रोकड चोरुन नेली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील करत आहेत.
येरवड्यात घरफोडी
येरवडा येथील बालाजीनगरमध्ये 75 हजार रुपयांची घरफोडी करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी घडकीस आली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फिर्यादी 50 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या राहत्या घराच्या तळमजल्यावरील खोलीचा दरवाजा लॉक होता. या दरवाजाचे कडीकोयंडा उचकटून चोरटा आत घुसला. यानंतर कपाटातील लॉकर तोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि दागिने खरेदी केल्याच्या पावत्या चोरून नेल्या. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक करपे तपास करत आहेत.